अमितभाऊ सुधाकरराव भुईगळ ! …भारीप बहुजन महासंघ युवा शहराध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष

अमितभाऊ सुधाकरराव भुईगळ !
भारीप बहुजन महासंघ युवा शहराध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष ….!एक खडतर राजकीय प्रवास !

साल असेल 1995-96 चे ! सगळीकडे अड बाळासाहेब आंबेडकर नावाचं आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघाच वारं सम्पूर्ण महाराष्ट्रात भरघाव वेगानं घोंघावत होतं ! या वाऱ्यावर स्वार होण्यास किलेअर्क मधील एक लहान मुलगा तयार झाला ! पण त्यावेळेस सत्तेत बसलेले पुढारी आणि त्यांच्या गराड्यात असणारे बाळासाहेब आपल्याला भेटतील कसे ? मला तर बाळासाहेबांसोबत फोटो काढायचा आहे ! पण हा लहान मुलगा जीद्दीला पेटला ! बाळासाहेब आणि सर्वच पुढारी हे त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान सुभेदारी विश्रामगृहात राहत असत ! आणि बाळासाहेब कितीही लाम्बचा प्रवास करून आले तरी सकाळीच उठतात आणि आलेली सर्व वर्तमानपत्रे वाचतात हे त्या लहान मुलाला कळले ! हा मुलगा पेपरातली बातमी वाचून सकाळीच सुभेदारी विश्रामगृहावर त्या दिवशी आलेले सगळे पेपर घेऊन जाऊ लागला ! येथुन त्या मुलाची बाळासाहेबांप्रति असणारी जवळीक वाढू लागली !

हळूहळू हा मुलगा आता पौगंडावस्थेकडे म्हणजेच मुलातून तरूणाकडे जात असतांना पूर्वी ओठावर मिशी अन गालावर दाढी न ठेवणारा आता आलेली कोवळी मिशी अन दाढी ठेऊ लागला ! ध्यास एकच बाळासाहेबांना पहावं आणि त्यांच्या पक्षात काम करावं ! मग बाळासाहेबांच्या पत्रकार परिषदा , कार्यकर्त्याच्या मीटिंगज , शिबिरे यात हा तरुण मुलगा सहभागी होऊ लागला ! त्याच वेळेस आमखास मैदान हे राजकीय पक्षांच्या शक्तिप्रदर्शन आणि आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वाचे स्थान होते ! तसेच जयभीम नगर घाटी या ठिकणि पक्षाचे विद्यमान नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती रहायचे !जयभीम नगर ते आमखास मैदान ही दोन्ही ठिकाणे व्हाया किलेअर्क वरूनच जायची ! आणि सुभेदारी ही जवळच ! हा मुलगा बाळासाहेब आले की पायी पायी सगळीकडेच जाऊ लागला ! आणि मनातल्या मनात विचार करू लागला की मी ही एक दिवस बाळासाहेबांसोबत सभा गाजवेल आणि याच व्ही आई पी रोडवर बाळासाहेबांसाठी ऑफिस बनवेल ! आता या मुलाची आत्मीयता बघून पक्षातील पुढारी त्याला पक्षात सामावून घेण्यास उत्सुक झाले ! या तरुण मुलाला भारीप बहुजन महासंघाने रीतसर नोंदणीकृत सदस्य करून घेतले आणि किलेअर्क चा वार्ड अध्यक्ष बनविले ! पुढे पक्षाचा रीतसर सदस्य आणि वार्ड अध्यक्ष झाल्यामुले या मुलाच्या अंगात हत्तीचे बळ संचारलं आणि तो पक्षाच्या मोर्च्यात आंदोलनात मोठ्या ताकदीने सहभागी होऊ लागला !

या मुलाला निसर्गाने भव्यदिव्य शरीरयष्टीची देणगी दिल्यामुळे हा ठिकठिकाणी ठळकपणे दिसू लागला ! या सर्व कामाची पावती म्हणून या मुलाला भारीप बहुजन महासंघाने युवक आघाडीचा औरंगाबाद शहराध्यक्ष बनविले ! आता मात्र हा मुलगा तरुण आणि तडफदार युवा नेता बनण्याच्या द्रुष्टीने मार्गक्रमण करू लागला ! बाळासाहेब ज्या रस्त्याने प्रवास करतात किंवा औरंगाबादेत येणारे सर्वच व्ही आई पी नेते मंडळी ज्या रस्त्याने जातात त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड वर या मुलाने लहानपणी पाहिलेले ऑफिसचे स्वप्न पूर्ण केले आणि बाळासाहेबांचा मोठा फोटो असणारे आणि जाणाऱ्या येणाऱ्या सर्वांच्या नजरेत भरणारे ऑफिस या रोडवर उभे केले !

आता या युवा नेत्याने औरंगाबाद शहरांतील दारिद्रय़रेषेखालील लोकांसाठी काम करणे सुरू केले ! जे जे समाजतील सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाकडून महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ सुरू केले होते ! पन्नास हजारांपासून ते पाच लाखापर्यंत कर्ज उद्योग वा भांडवल उभारण्यास सरकार या बेरोजगाराना देत होते ! पण राष्ट्रीयकृत बँका ही प्रकरणे मंजूर करण्यास टाळाटाळ करीत असत ! पन्नास हजार रुपयाचा प्रस्ताव आला की एक तर बँक मनेजर प्रकरणात त्रुटी काढत असे किंवा अपूर्ण कागदपत्रे आहेत म्हणून प्रकरण नामंजूर करत असे ! कारण त्या बँक अधिकाऱ्याला या पर्सेंट पाहिजे असत ! या सगळ्या प्रकरणांचा अभ्यास करून या युवा नेत्याने आधी बँकेवर धडक मारली आणि बँक अधिकाऱ्याला ही प्रकरणे मंजूर का करत नाहीत म्हणून जाब विचारला ! ऐकले नही तर त्याला दोन फटके देऊन सरळ केले ! या प्रकरणांत सरकारी कामात अडथळा म्हणून या युवा नेत्यावर गुन्हे ही दाखल झाले ! पण हा नेता मागे हटला नाही ! पुढे महाराष्ट्र शासनाने महसुली कागदपत्रे काढण्यासाठी खाजगीकरण केले आणि प्रत्येक जिल्ह्यात सेतू उभारले ! या सेतूमध्ये अप्रशिक्षित आणि खाजगी स्टाफ भरल्याने लोकांना कागदपत्रे मिळण्यास वीलम्ब होऊ लागला ! या युवा नेत्याने हा प्रश्न हाती घेतला आणि हा काचेचा सेतू महाराष्ट्रात सगळ्यात आधी औरंगाबादेत फोडला ! पोलिस आले आणि अटक करून घेऊन गेले ! अश्या प्रकारे अनेक आंदोलने करत असताना गुन्हे वाढत गेले ! पण हे गुन्हे काही चोरी किंवा दरोड्याच्या प्रकरणातील नव्हते तर समाजाला न्याय हक्क मिळवा यासाठी होते ! मग एक वेळ या युवा नेत्याला शहरातून हद्दपार करावे अश्याही चर्चा गुप्तपणे सूरु झाल्या ! पण फक्त बाळासाहेबांवरील निस्सीम श्रद्धा (अंधश्रद्धा नव्हे ) आणि सामजिक जाणिवेमुळे हा युवा नेता या सरकारी जाचात अडकला नाही ! तो सहीसलामत आणि सुखरूपपणे या प्रकरणी क्लीन चिट पावला ! अचानकपणे एक दिवस बाळासाहेबांनी युवक आघाडी बरखास्त केली ! मग पदाशिवाय काम कसे करायचे हा प्रश्न पडणे साहजिकच आहे! पण हा नेता युवा नेता ही बिरुदावली लावुन भारीप बहुजन महासंघाचे काम करतच राहिला ! आणि एका पक्षाने दिलेल्या आदेशांनुसार घेतलेल्या मेळाव्यात या युवा नेत्यास खुद्द बाळासाहेबांनी औरंगाबाद शहर अध्यक्ष म्हणून घोषित केले ! आता हा युवा नेता खऱ्या अर्थाने पक्षाच्या फादर बॉडीत आला ! आणि औरंगाबाद शहरात महानगरपालिका निवडणुका आल्या ! मग किलेअर्क मधून निवडणूक लढवावी असे या युवा नेत्याला वाटले ! पक्षाने तशी संमती दिली ! या भागात बौध्द आणि मुस्लिम मतदार आहेत ! बौध्द मंडळीना विहार नाही अन मुस्लिमांना मस्जिद नाही ! या भागात हज हाऊस मंजुरीच्या प्रतीक्षेत असूनही अजूनही ते पूर्णत्वास नाही !हज हाऊस साठी या युवा नेत्याने आंदोलन केले आणि प्रसंगी स्वतःवर गुन्हे नोंदवून जेल मध्ये जाणे पसंत केले ! हे मुद्दे समोर ठेवून या युवा नेत्याने निवडणूक लढविली ! समोरचा प्रतिस्पर्धी आपला बौद्ध असून तो सत्ताधारी कॉंग्रेस पक्षावर उभा ! त्याच्या प्रचाराला cabinet आणि राज्यमंत्री ! आणि या नेत्याच्या प्रचाराला फक्त बाळासाहेब ! वातावरण भारीप ला अतिशय प्रतिकूल ! पण प्रस्थापित सत्ताधारी विद्यमान नगरसेवकाला चरिमुण्ड्या चित करत हा युवा नेता महानगरपालिकेच्या लोकशाहीवादी सभग्रूहात स्वबळावर पोहोचला ! सोबत पक्षाच्या एका नगरसेवकालाही निवडून आणले ! एक सामान्य कुटुम्बातील स्लीपर चप्पल घालणारा कार्यकर्ता आज महानगरपालिकेत जाणे हेच बाबासाहेबानी सांगितलेल्या आणि बाळासाहेबांनी सांगितलेल्या लोकशाहीचे सामाजिकरण होय ! नगरसेवक झाल्यामुले कामाचा उत्साह वाढला अन हा युवा नेता औरंगाबादचा जिल्हाध्यक्ष झाला ! आता काम वाढले ! कार्यकर्ते वाढले ! अशातच आंदोलनाच्या दिशा बदलल्या ! पक्षांच्या सभा होऊ लागल्या ! पण पूर्वीच्या सभा आणि आताच्या सभांमध्ये खूपच फरक पडला ! पूर्वीच्या सभा ह्या परम्परागत पद्धतीने आणि आपल्या कार्यकर्त्याच्या बजेटमध्ये बसणाऱ्या असायच्या ! या नेत्याने या सभांना एक कॉर्पोरेट लुक दिला ! बाळासाहेबांना एक नॉलेजेबल लिडर म्हणून मीडिया समोर उभे केले ! अशातच औरंगाबादला भारतीय बौध्द महासभेचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले गेले ! या अधिवेशनाची बरीचशी जबाबदारी या युवा नेत्यावर आली नव्हे त्याने ती स्वतःहून घेतली ! आणि हे अधिवेशन ऐतिहासिकदृष्टया महत्वाचे ठरले ! यानंतर हा युवा नेता सतत काम करीत राहिला ! पक्षवाढीसाठी महाराष्ट्रभर फिरत राहिला ! बाळासाहेबांनी पुकारलेल्या सर्वच आंदोलनात हा युवा नेता सहभागी झाला ! अशाच एका मोर्चात मुम्बईत हा युवा नेता भर पावसात भिजला ! आणि हे भिजणं ह्या महाकाय आणि बलदंड शरीराच्या युवा नेत्याला फारच महागात पडले ! सर्दी पडसे आणि व्हायरल फेव्हर चे निमित्ताने पुढे न्यूमोनिया झाला आणि ह्या युवा नेत्याला सिग्मा हॉस्पिटलात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले !

आमचा युवा नेता सीरीयस झाला ! पाच सहा दिवस अनकॉन्शियस ! सारा मराठवाडा आणि महाराष्ट्र शोकसागरात बुडाला ! बाळासाहेबांना हे समजताच ते तडक पुण्याहून युवा नेत्याला भेटण्यास आले आणि डॉ उम्णेष टाकळकर यांना भेटून प्रक्रुतीची विचारपूस केली ! त्यांनी आश्वासन दिले की आम्ही आपल्या युवा नेत्याला ठीक करु ! यानंतर बाळासाहेबांना हायसे वाटले ! आणी त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला ! जर या युवा नेत्याला इथेही बरे वाटले नसते तर बाळासाहेबांनी त्याला त्याच्या उपचारासाठी देश विदेशातील मोठमोठ्या डॉक्टरकडे नेले असते पण त्याला यातून सहीसलामत बाहेर काढलेच असते ! आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मुम्बईच्या निषेध मोर्चात हां युवा नेता सहभागी झाला आणि तेथे केलेल्या धडाकेबाज भाषणाने सम्पूर्ण महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ बनला ! पुढे औरंगाबादेत आंबेडकर भवन पडणारा मुख्य आरोपी रत्नाकर गायकवाड ला झेड सुरक्षा तोडून बेदम चोप दिला आणि परत हां युवा नेता महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला ! या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली मग पी सी आर आणि मग एम सी आर ! तेथून बाहेर आल्यानंतर नाशिकला हां युवक नेता सम्पूर्ण महाराष्ट्राचा यूथ आयकॉन बनलाच सोबतच भीम योद्धा पुरस्काराने सन्मानित झाला ! याआधी दैनिक व्रूत्तरत्न सम्राट आणि सम्राट विचार मंच च्या वतीने या युवा नेत्याला कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ! पुढे भीमा कोरेगाव घडले ! सर्वच नेते भूमिगत झाले ! बाळासाहेब एकटे या व्यवस्थेशी लढत असताना हां युवा नेता औरंगाबादेत गल्लोगल्ली फिरला ! पोलिसांनी भीम सैनिकांवर केलेल्या कोम्बिंग ऑपरेशन विरुध्द वरिष्ठांकडे दाद मागितली ! बाळासाहेबांनी या बाबीचा पाठपुरावा केला ! आणि मग परत भीमा कोरेगाव पासून बाळासाहेबांचा झन्झवात सुरु झाला ! बाळासाहेब जेथे जेथे आमचा युवा नेता तेथे तेथे सावली प्रमाणे राहू लगला ! मग भारीप च्या महाराष्ट्र शाखेचे पुणर्गठण करण्यात आले ! तेव्हा या युवा नेत्याला महाराष्ट्र प्रदेश महासचिव करण्यात आले ! मग या युवा नेत्याची पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्रभर नवीन पदाधिकाऱ्यांना सोबतच घेउन दौरे सुरु झाले ! महाराष्ट्र बांधायला सुरुवात झाली ! बाळासाहेबांनी नवीन वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला ! आणि महाराष्ट्रावर सभेचा झन्झावात सुरु झाला ! एम आई एम सोबत युती झाली ! खा असदुद्दीण ओवेसी आणि बाळासाहेब आंबेडकरांची संयुक्त सभा औरंगाबादेत शेतकरी महाअधिवेशन या बेनर खाली झाली ! या सभेने गर्दीचे सर्वच उच्चांक मोडले ! या सभेच्या नियोजनात मास्टर माइंड हां युवा नेता होता हें वाचकांनी विसरू नये ! जेथे आंबेडकरांचा परीसस्पर्श झाला तो माणूसच सोन्याचा झाला ! आणि हां नेता गळ्यात भारीपचे सोन्याचे लॉकेट घालून सोन्याने मढवला गेला ! स्वतःचा कुठलाही अहंगंड न बाळगता हां युवा नेता भर सभेत म्हणतो केवळ आणि केवळ बाळासाहेबांमुळेच हे शरीर सोन्याने मढलेल आहे ! बाळासाहेबांविषयी या नेत्याला प्रचंड आदर आणि प्रेम आहे ! बाळासाहेब आणि अंजलीताई या युवा नेत्याला लहान मुलांप्रमाणे सांभाळतात ! सुजात आंबेडकर या युवा नेत्याला दादा म्हणून संबोधतात! बाळासाहेबांवरील प्रेम हां नेता कसा व्यक्त करतो तर हें आपल्याला बाळासाहेबांच्या वाढदिवशी कळेल ! स्वतःचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि विना जाहिरात देणारा हां युवा नेता मात्र बाळासाहेबांच्या वाढदिवशी सर्वच वर्तमानपत्राचे पहिले पान बाळासाहेबांच्या जाहिरातींने भरतो ! आणि यात बाळासाहेब सम्पूर्ण जाहिरातीत असतात ! आणि युवा नेता अत्यंत नम्रपणे त्यांच्या खाली ! जाहिरातीत मजकूर ही अत्यंत कमी ! श्रद्धेय मा खा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा ! पण जाहिरात अत्यंत आकर्षक ! एकदा बाळासाहेबांच्या वाढदिवसाची जाहिरात या युवा नेत्याने आपल्या अंगावरील सोने गहाण ठेऊन दिली होती हें विशेष ! आणखी या युवा नेत्याची एक खासियत म्हणजे हां व्यवहारात अत्यंत पारदर्शक आणि प्रामाणिक आहे ! दिलेला शब्द पाळतो ! जाहिरातीचे पैसे बुड्वत नाही ! जसा बोलला तसच वागणार ! मी ज्या वर्तमानपत्रात काम करतो त्या दैनिक व्रुत्तरत्न सम्राट ला हां युवा नेता दरवर्षी एक जाहिरात देतो ! क्वॉर्टर पेज ! हाफ पेज ! फूल पेज ! पैसे cash ! गेल्या पंधरा वर्षापासून न चुकता 9तारखेला या युवा नेत्याचा फोन येणार ! आणि अत्यंत नम्रपणे आणि अदबीने बोलणार ! आनंद भाऊ ! साहेबांच्या वाढदिवसाची जाहिरात मेल केलीय ! पाहून घ्या ! पैसे कुठे पाठवू ! की तूम्ही येता ! या ! गप्पा मारू ! चहा घेऊ ! मग नित्यनेमाने दरवर्षी बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री अकरा साडेअकराला आमची भेट ठरलेली ! साधारणतः दीड दोन तास चर्चा ! पण गेल्या बरोबरच आपल्या हातात पैश्यांच पाकीट ! त्या पाकिटात किती पैसे अहेत हें मी अजूनही कधी मोजले नाहीत ना त्यांनी कधी एवढे अहेत तेवढे अहेत म्हणून बारगेनिंग केली नाही ! एकदा खूपच उशीर झाला तर हां युवा नेता म्हणला की भाऊ तुम्हाला घरी सोडतो ! एव्ढे पैशे घेउन अपरात्री जाऊ नका ! लोकांचा काही भरवसा नाही ! मी म्हणालो काही हरकत नाही ! हें पैसे घ्या ! मी परत सकाळी येतो ! त्यावर युवा नेत्याने उत्तर दिले भाऊ तुम्हालाही ऑफिस ला द्यावे लागतात ! तूम्ही चेक घ्या आणि सकाळी बँकेतून काढून तुमच्या ऑफीस ला पाठवा ! काही प्रॉब्लम नाही ! असा हां दिलदार नेता ! मनाचा राजा माणूस ! तरुणाचा यूथ आयकॉन ! काल दि 19 फेब्रुवारी ला बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वाक्षरीचे एक पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले अमितभाऊ भुईगळ ह्यांची भारीप बहुजन महासंघाच्या युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली ! ही अत्यंत आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे ! औरंगाबाद शहराचा युवक आघाडीचा अध्यक्ष ते महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष ! हां फ़ार मोठा राजकीय प्रवास आहे ! संघर्ष आहे ! हें सहजशक्य झालेले नाही ! यासाठी अनेक वर्षांचा त्याग आहे ! या पदात आणखी औरंगाबाद पश्चिम मधून आमदारकीचा शिक्का लागो ही तथागत बुध्द आणि डॉ बाबासाहेबांच्या विचारांना अनुसरून मंगल कामना ! जय भीम जय प्रबुद्ध भारत ! .
आनंद दिवाकर चक्रनारायण जिल्हा प्रतिनिधी दैनिक व्रुत्तरत्न सम्राट औरंगाबाद मो 7058630366 दि 20 फेब्रुवारी 2019 !

Author: Ambedkaree.com

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *