अखेर भीमा कोरेगाव प्रकरणी : पुणे कोर्टाची भिडेला नोटीस

अखेर भीमा कोरेगाव प्रकरणी : पुणे कोर्टाची भिडेला नोटीस
भीमा कोरेगाव येथे जानेवारी महिन्यात झालेल्या दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांना पुणे न्यायालयाने नोटीस दिली आहे. ही घटना घडविण्यामागे भिडे गुरुजींचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. पुणे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नोटीस देण्यात आली असून, २५ एप्रिल रोजी भिडे गुरुजी किंवा त्यांच्या वकिलाने न्यायालयात हजर रहावे, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा येथील हिंसाचारामागे हात असल्याच्या आरोपावरून मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली आहे. एकबोटे यांच्याप्रमाणेच भिडे यांनाही अटक करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भिडे यांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी सांगली, कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात समर्थनार्थ मोर्चे काढले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *